23 January 2020

News Flash

मराठीचा अभिमान हवाच, मात्र इंग्रजीही महत्त्वाचे – गिरीश बापट

‘शाळांमध्ये भारतीय संस्कार आणि इंग्रजी भाषा यांची सांगड घालून शिक्षण मिळाले पाहिजे.

‘शाळांमध्ये भारतीय संस्कार आणि इंग्रजी भाषा यांची सांगड घालून शिक्षण मिळाले पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा प्रसार केलाच पाहिजे. मात्र त्याचवेळी, जगभर काम करण्यासाठी इंग्रजीही आत्मसात केली पाहिजे,’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या (न्यू इंग्लिश मिडियम स्कूल) नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात बापट बोलत होते. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन, विकास काकतकर, आनंद भिडे, किरण शाळिग्राम, डॉ. शरद कुंटे, दिलीप कोटीभास्कर, सुनील भडंगे, श्रीकांत बापट, कृष्णकांत कुदळे आदी उपस्थित होते.

First Published on June 13, 2016 1:29 am

Web Title: must feel proud on marathi but english is important says girish bapat
टॅग Girish Bapat,Marathi
Next Stories
1 खडकीत टोळक्याचा धुडगूस
2 रंगला ‘मनतरंग महोत्सव’!
3 छळाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या
Just Now!
X