आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्रीनिवास सोहोनी यांचे मत
आयसिस या दहशतवादी संघटनेपासून भारतातील तरुणांना रोखण्यामध्ये पोलीस यंत्रणेचे काम कौतुकास्पद आहे. प्रत्येक माणसाने सामाजिक भान राखून पोलिसांना सहकार्य करीत राष्ट्रीय सुरक्षेबाबत समाजामध्ये जागरूकता वाढवणे आवश्यक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्रीनिवास सोहोनी यांनी व्यक्त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘कट्टरता आणि अतिरेकी विचारांना प्रतिबंध’ विषयावर सोहोनी यांचे व्याख्यान झाले. सभेचे उपाध्यक्ष सुरेश िपगळे या वेळी उपस्थित होते. सोहोनी म्हणाले, आयसिससारख्या संघटनांकडून भारताला मोठा धोका असून, यामध्ये महाराष्ट्राने योगदान देणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज इस्लामची लाट परतवून लावण्यात पर्वतासारखे उभे राहिले. इस्लाम हाच एक परिपूर्ण धर्म असल्याचा प्रचार समाजमाध्यमांतून होत आहे. इस्लामिक अतिरेकाला प्रतिकार करणे कठीण असले तरी सरकारकडून योग्य पावले उचलली जात आहेत. कुटुंबीयांनीही घरातील सदस्यांवर लक्ष ठेवले तर युवक वाममार्गाला जाणार नाहीत.