21 January 2019

News Flash

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार गणेश विसपुते यांना जाहीर

ओरहान पामुक यांच्या ‘माय नेम इज रेड’ या कादंबरीच्या अनुवादासाठी विसपुते यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

| August 31, 2015 03:25 am

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे गणेश विसपुते यांना यंदाचा बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. ओरहान पामुक यांच्या ‘माय नेम इज रेड’ या कादंबरीच्या अनुवादासाठी विसपुते यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
कवी िवदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा, असे सुचविले होते. प्रा. हरिश्चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखालील दीपक घारे, चंद्रकांत भोंजाळ आणि प्रफुल्ल शिलेदार यांच्या निवड समितीने गणेश विसपुते यांनी अनुवादित केलेल्या ‘माय नेम इज रेड’ या पुस्तकाची निवड केली आहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून एका विशेष कार्यक्रमात विसपुते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

First Published on August 31, 2015 3:25 am

Web Title: my name is red ganesh vispute balshastri jambhekar