पुणे : सह्याद्रीच्या जंगलात आढळणाऱ्या बांबूच्या मेस आणि माणगा या प्रजातींमधील फरक पहिल्यांदाच संशोधनातून स्पष्ट झाला आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या सन्मानार्थ बांबूच्या मेस या प्रजातीचे नामकरण ‘सुडोओक्सीनानथेरा माधवी’ असे करण्यात आले आहे.

ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ. पी. तेताली, केरळच्या वन संशोधन केंद्राचे डॉ. मुरलीधरन, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार, डॉ. सुजाता तेताली, सारंग बोकील आणि डॉ. रितेश चौधरी यांनी बांबूच्या प्रजातींचे संशोधन केले आहे.

Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
vasai gold chain theft marathi news
वसईत ‘बंटी बबलीची’ अनोखी चोरी, प्रख्यात ज्वेलर्स दुकानाला हातोहात गंडवले
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
oil companies latest marathi news
तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?

या संशोधनाचा शोधनिबंध ‘फायटोटॉक्सा’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. पुण्याजवळील पानशेत परिसरातील शिरकोलीच्या जंगलात बांबूचे संशोधन करण्यात आले.

बांबूला आयुष्यात एकदाच फुले येत असल्याने फुलांशिवाय बांबूच्या प्रजातीची ओळख निश्चित करता येत नाही. ४० ते ६० वर्षांनी बांबूचे बेट मरते. आतापर्यंत मेस आणि माणगा या दोन्ही प्रजातींना सुडोओक्सीनानथेरा स्टोकसी हे एकच शास्त्रीय नाव असल्याने गोंधळ होत होता. डॉ. पी. तेताली यांनी अनेक वर्षांच्या निरीक्षणाद्वारे फुलांच्या माध्यमातून या दोन प्रजातींमधील फरक निश्चित के ला. त्यामुळे या प्रजातींच्या ओळखीतील गुंता सोडवण्यात यश आले. या दोन प्रजातींमधील फरक स्पष्ट होण्यासाठी मेस प्रजातीचे नव्याने नामकरण करण्यात आले आहे.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या पर्यावरण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी मेस प्रजातीला सुडोओक्सीनानथेरा माधवी असे नाव देण्यात आले. या संशोधनामुळे बांबूच्या दोन प्रजातींमधील महत्त्वपूर्ण पहिल्यांदाच समोर येऊन मेस आणि माणगा या प्रजाती वेगळ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.