16 November 2019

News Flash

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात विरोधाभास

बचाव पक्षाच्या वकिलांचा दावा

बचाव पक्षाच्या वकिलांचा दावा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेले अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून(सीबीआय) १७ जून रोजी  म्हणणे (से) मांडण्यात येणार आहे. सीबीआयने बाजू मांडल्यानंतर अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाकडून निर्णय देण्यात येणार आहे. दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दाखल केलेल्या दोन दोषारोपपत्रांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे, असा दावा बचाव पक्षाक डून मंगळवारी न्यायालयात करण्यात आला.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अ‍ॅड. पुनाळेकर यांच्यासह विक्रम भावे यांना अटक करण्यात आल्यानंतर दोघे जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अ‍ॅड. पुनाळेकर यांनी जामीन मिळवण्यासाठी विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला. त्यानंतर सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सीबीआयने दाखल केलेल्या दोन दोषारोपपत्रांमध्ये विरोधाभास आढळून आला आहे. सीबीआयने या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याच्या जबाबानुसार अ‍ॅड. पुनाळेकर यांना अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी सीबीआयनेच २०१६ मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सनातनचे सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे म्हटले होते, असे अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी युक्तिवादात स्पष्ट केले.

First Published on June 12, 2019 3:02 am

Web Title: narendra dabholkar murder case 7