26 September 2020

News Flash

मोदींनी भाजप ‘हायजॅक’ केला – अजित पवार

नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्ष हायजॅक केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

| October 13, 2014 01:21 am

नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्ष हायजॅक केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपुष्टात येतो आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
नरेंद्र मोदींनी सर्व पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. पक्षातील वयस्कर नेत्यांना अडगळीत टाकण्यात आल्याचा आरोप करून भाजपच्या प्रचारात लालकृष्ण अडवाणी कुठे दिसत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आत्ता भाजपमध्ये जे मोदींचे समर्थन करीत आहेत, त्यांनाही नंतर कळेल, असाही टोला अजित पवार यांनी लगावला.
पवार कुटुंबीयांनी बारामतीतील लोकांना गुलाम केल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता, त्याला अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, देशातील याआधीच्या पंतप्रधानांनी बारामती मॉडेलचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी आमच्याबद्दल खोटा प्रचार करीत आहेत. बारामतीमध्ये इतर पक्षांच्या सभांसाठी आम्ही आमच्याकडील संस्थांच्या जागा लगेचच उपलब्ध करून देतो, असाही दाखला त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:21 am

Web Title: narendra modi hijack bjp says ajit pawar
Next Stories
1 जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सुमती टिकेकर यांचे निधन
2 एकच छंद जोपासणे अवघड – नाना पाटेकर
3 मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
Just Now!
X