01 March 2021

News Flash

पुणे : गणपती विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीचे रांगोळीतून पर्यावरणावर भाष्य

पुणेकरांचे वेधले लक्ष

लाडक्या गणरायाची सेवा केल्यानंतर सर्वत्र बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. पुण्यातही मानांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. मंडई चौकापासून सुरू झालेल्या विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीने सुंदर रांगोळी रेखाटली असून, अकादमीने रांगोळीतून पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे भाष्य केले आहे.

राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दरवर्षी विसर्जन मार्गावर रांगोळी काढण्यात येते. रांगोळीच्या माध्यमातूून वेगवेगळे विषय अकादमीकडून मांडले जातात. यंदा निसर्गावर मानवाकडून होणार्‍या अत्याचारावर आधारित मंडई चौक ते अलका टॉकीज चौका दरम्यान संदेश देणार्‍या रांगोळी साकारण्यात आल्या आहेत. अकादमीने पर्यावरणाचा ऱ्हासाकडे पुणेकरांचे लक्ष वेधले असून, या रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

व्हिडीओ पाहा-

रांगोळीविषयी बोलताना राष्ट्रीय कला अकादमीचे अतुल सोनवणे म्हणाले, “बापाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही मागील २१ वर्षापासून सामाजिक विषय हाती घेऊन रांगोळी काढत असतो. यंदा निसर्गावर मानवाकडून होणार्‍या अत्याचारावर आधारित मंडई चौक ते अलका टॉकीज चौका दरम्यान संदेश देणार्‍या रांगोळी साकारण्यात आल्या आहे. यामध्ये झाडाची बेसुमार कत्तल, पुण्यात भिंत पडून घडलेल्या घटना दाखविण्यात आल्या आहे. या रांगोळीना पुणेकर नागरिकाचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या रांगोळीमधून काही संदेश घेऊन समाजात परिवर्तन व्हावे. असा आमचा दरवर्षी मानस असतो”, सोनवणे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 11:31 am

Web Title: national art academy draw rangoli on ganpati vasarjan marg bmh 90
Next Stories
1 पुणे : गणपती विसर्जन मिरवणूक, वाहतूक मार्गांमध्ये बदल; १७ रस्ते बंद
2 काय आहे ‘खुनी गणपती’च्या विसर्जन मिरवणुकीचा इतिहास?
3 म्यानमारमध्येही मराठमोळ्या पद्धतीनं गणेशोत्सवाची धूम
Just Now!
X