News Flash

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतील ‘एफटीआयआय’ची पारितोषिके घटली

२०१५ मधील आंदोलनाचा फटका?

२०१५ मधील आंदोलनाचा फटका?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतील ‘नॉन फिचर’ या विभागात दबदबा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) लघुपटांना पुरस्कार मिळण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून येत आहे. विशेषत २०१५ मध्ये विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर केवळ दोन लघुपटांना पुरस्कार मिळाले असून २०१३ नंतर संस्थेच्या लघुपटाला सुवर्णकमळ मिळालेले नाही.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात एफटीआयआयच्या दोन विद्यार्थ्यांना वैयक्तिक पारितोषिके मिळाली. मात्र, संस्थेने निर्मिती केलेल्या एकाही लघुपटाला पुरस्कार मिळू शकला नाही. या पाश्र्वभूमीवर, गेल्या काही वर्षांतील संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला असता, २०१५ नंतर संस्थेच्या पुरस्कारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. २०१७ च्या पुरस्कारांमध्ये दोन लघुपटांसह एक वैयक्तिक पारितोषिक, २०१६ मध्ये केवळ एक वैयक्तिक पारितोषिक मिळाले होते, तर २०१५ मध्ये एकाही लघुपटाला किंवा वैयक्तिक पारितोषिक देण्यात आले नव्हते.

तर २००५ पूर्वी सात वर्षात संस्थेच्या पाच लघुपटांनी सुवर्णकमळ मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यात २०१२ आणि २०१३ अशी सलग दोन वर्षे, त्याआधी २००७, २००८ आणि २०१० मध्येही संस्थेच्या लघुपटांना सुवर्णकमळ मिळाले होते. २००५ मध्ये तर तीन लघुपटांना आणि चार वैयक्तिक पारितोषिके अशी एकूण सात पारितोषिके संस्थेकडे आली होती. या पार्श्वभूमीवर, संस्थेच्या पारितोषिकांची घटलेली संख्या लक्षणीय ठरत आहे.

इफ्फीतील सहभाग

२००५ मध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्यानंतर सरकारविरोधात विद्यार्थांनी जवळपास सहा महिने संप केला होता. परिणामी सरकारने आंतराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवातील विद्यार्थांचे चित्रपट दाखविण्याचा विभागच रद्द केला. त्यानंतर दोन वर्षे विद्यार्थांचे लघुपट दाखवण्यात आले नाहीत. तर गेल्या वर्षीच्या मोहोत्सवात ‘भरदुपारी’ आणि ‘हॅपी बर्थ’ हे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दोन लघुपट दाखवण्यात आले होते. मात्र, इफ्फीच्या सुवर्णमोहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यंदा मोहोत्सवाच्या नियोजनात विद्यार्थांना सामावून घेतले जाणार आहे.

तर २०१५ पूर्वी सात वर्षांत संस्थेच्या पाच लघुपटांनी सुवर्णकमळ पुरस्कारांसाठी स्वतंत्र समिती काम करते. चित्रपट पाहून समिती पुरस्कारांबाबत निर्णय घेते. त्यामुळे २०१५ मधील आंदोलनाचा पुरस्कार मिळण्याशी काही संबंध आहे असे वाटत नाही. गेल्या काही वर्षांत दूरचित्रवाणी विभागाच्या लघुपटांनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच अनेक व्यावसायिक कलाकारांच्या, संस्थांच्या लघुपटांमुळे स्पर्धा वाढल्याचा परिणाम असू शकेल.       – भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 4:54 am

Web Title: national movie award 2019 ftii central government mpg 94
Next Stories
1 डावखुऱ्या मुलांना कलेची विनामूल्य शिकवणी
2 रद्द केलेल्या रेल्वे गाडय़ांचे तिकीट ‘कन्फर्म’!
3 पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
Just Now!
X