26 September 2020

News Flash

नयना पुजारी खून खटला वेगाने चालविण्याचे न्यायालयाचे आदेश

संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खून खटल्याची सुनावणी वेगाने चालविण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली होती.

| October 1, 2013 02:37 am

संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खून खटल्याची सुनावणी वेगाने चालविण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने हा खटला वेगाने चालवा, अशा सूचना दोन्ही बाजूंना केल्या असून पुढील सुनावणी १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस ठेवली आहे, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी दिली.
विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. हा खटला लांबत चालल्यामुळे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी खटला वेगाने चालविण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने खटला वेगाने चालविण्याच्या सूचना दिल्या. या खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊतला पकडल्यानंतर काही आरोपींची पुन्हा उलटतपासणी घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार अॅड बी. ए. अलुर यांनी पंच साक्षीदार राहुल पाटोळे आणि इनलॅक्स बुधराणी रुग्णालयाचे डॉ. प्रकाश निंबोरे यांची उलटतपासणी घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:37 am

Web Title: nayana pujari murder case 2
Next Stories
1 कासारवाडीत ८३ लाखांचा डल्ला; चोरांचा सुळसुळाट कायम
2 अमूर्त शैलीचे प्रसिद्ध चित्रकार विजय शिंदे यांचे निधन
3 ‘स्वच्छ’ची सेवा थांबवून कचरा व्यवस्थापन टेंडर प्रक्रियेद्वारे करण्याचा विद्यापीठाचा निर्णय
Just Now!
X