संगणक अभियंता नयना पुजारी खूनप्रकरणातील फरार आरोपी योगेश राऊतला पकडण्यात पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक विभागाला यश आले. राऊतला पोलिसांनी गुरुवारी दिल्लीमध्ये अटक केली. राऊत पळून गेल्याच्या घटनेला आता दोन वर्ष होत आली असून तो पोलिसांना गुंगारा देत होता. 
खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून बससाठी थांबली असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाल्यानंतर आरोपींपैकी राजेश चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले व त्याचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला. खटल्यास सुरुवात झाल्यानंतर उपचारांसाठी राऊतला ससून रुग्णालयात नेले असता सप्टेंबर २०११ मध्ये तो पळून गेला. राऊत हा या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी असल्यामुळे खटला लांबत गेला.

dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी