News Flash

Nayana Pujari case : नयना पुजारी खून खटल्यात तिन्ही आरोपी दोषी; उद्या शिक्षेची सुनावणी

सात वर्षांनंतर खटल्याचा निकाल

Nayana Pujari,Nayana Pujari verdict : नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला होता.

पुण्यातील बहुचर्चित नयना पुजारी खून खटल्यात Nayana Pujari case सोमवारी न्यायालयाने अंतिम निकाल दिला. गेल्या सात वर्षांपासून शिवाजीनगर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. अखेर आज विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. यावेळी न्यायालयाकडून योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर या तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आले. या तिघांवरील बलात्कार, अपहरण, खून आणि चोरीचे आरोप सिद्ध झाले आहेत.  सत्र न्यायालयाकडून उद्या तिन्ही आरोपींना शिक्षा सुनाविण्यात येईल.

या निकालानंतर नयना पुजारी यांच्या नातेवाईकांनी दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली. तसेच या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. खुनाच्या आरोपींना ज्याप्रकारे फाशीची शिक्षा दिली जाते. त्याप्रमाणे बलात्कार करणाऱ्या आरोपीलाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नयना पुजारी यांचे पती अभिजीत पुजारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीसाठी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात आणण्यास उशीर झाला. न्यायालयाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलिसांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून ३७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. तर बचाव पक्षाकडून अ‍ॅड. बी. ए. अलुर, रणजीत ढोमसे पाटील, अंकुशराजे जाधव काम पाहात होते. बचाव पक्षाकडून १३ साक्षीदार तपासण्यात आले  होते.

संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २८, रा. अशोकाआगम, दत्तनगर, कात्रज) या ८ ऑक्टोबर २००९ रोजी कामावरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी हडपसर येथे सोडण्याचा बहाणा करून मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह खेड तालुक्यातील जरेवाडी फाटा येथे टाकून देण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.

पोलिसांकडून या गुन्ह्य़ाचा तपास करून आरोपी योगेश अशोक  राऊत (वय २४), राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, दोघे रा. गोळेगाव, ता. खेड, जि. पुणे) महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), विश्वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी, आळंदी रस्ता, मूळ रा. भुरकवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली होती.

आरोपी घटनास्थळी हजर असल्याचे तपासात निष्पन्न

या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपी योगेश राऊत हा ससून रुग्णालयातून पसार झाला होता. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, पोलीस नाईक संतोष जगताप यांच्या पथकाने त्याला शिर्डी येथे पकडले होते. दरम्यान, राऊत याला पसार झाल्याप्रकरणी न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात आरोपी राजेश चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविण्यात आला होता. बचाव पक्षाकडून चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यास उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते.

आयटी दारी असुरक्षितताच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 11:39 am

Web Title: nayana pujari verdict gangrape murder case july 2009 alandi pune in marathi
Next Stories
1 पारदर्शक उदासिनता : गुडघा मोडला असतानाही रौप्यपदक विजेता खेळाडू सरकारी मदतीपासून वंचित
2 पुण्यात पावसाचा शिडकावा;बारामती, शिरूरमध्ये जोरदार पाऊस
3 राज्यात पावसाळापूर्व सरींची शक्यता
Just Now!
X