News Flash

विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेने रोखला पुणे-मुंबई महामार्ग

पोलिसांनी १०० ते १५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

ना चोर ना चौकीदार!, गाजर नको, रोजगार हवा! नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेने पुणे-मुंबई महामार्ग काही वेळासाठी रोखून धरला होता. वाढती बेरोजगारी, महापरीक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्याप्रमाणेच पोलीस भरती करा या आणि अशा मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेने हे आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी १०० ते १५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. महामार्गावरची वाहतूकही काही वेळासाठी वळवण्यात आली होती. त्यामुळे या आंदोलनाचा फारसा परिणाम वाहतुकीवर जाणवला नाही.

तळेगाव पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मार्ग सुरू करण्यात आला. सध्या राज्यासह देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे विविध संघटना आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. आज मंगळवारी पुणे मुंबई महामार्ग रोखून धरत राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने आंदोलन केले यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. महामार्गावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा महामार्गावर होता, रस्त्याला छावणीचे स्वरूप आले होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळासाठी वळवण्यात आली होती. त्यामुळे आंदोलनाचा म्हणावा तसा परिणाम वाहतुकीवर झालेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:03 pm

Web Title: ncp aandolan against government scj 81
Next Stories
1 श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेटलींचा फोटो दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून
2 पुणे-मुंबई इंटरसिटीचा वेग वाढूनही प्रवाशांचा खोळंबा कायम
3 सातारा रस्त्याचे सुरक्षा परीक्षण
Just Now!
X