गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर शनिवारी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. जे आमदार येणार असतील त्यांची नावे सांगा असे आवाहन करत पवार यांनी ज्यांना जायचे असेल ते जातील असेही असेही नमूद केले. ते पिंपरी-चिंचवड शहरात खासगी हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. त्यातील काही जण युतीत प्रवेशासाठी इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात शुक्रवारी केला होता. त्यावर अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे. वाटेवर म्हणण्यापेक्षा त्या आमदारांची नावे सांगा, उद्या कोणीही काहीही म्हणेल. जे वाटेवर असतील ते जातील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.