04 March 2021

News Flash

शरद पवारांच्या हत्येची धमकी, पोलिसात तक्रार दाखल

या प्रकरणी पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि एका वेब पोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांच्या हत्येची चिथावणी देत असल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीत काय म्हटलं आहे?

शरद पवार यांच्या हत्येच्या कट आणि महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान असा विषय देत ही तक्रार लक्ष्मीकांत खाबिया यांनी दाखल केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून समाजमाध्यमांवर टोकाची विद्वेशाची भावना पसरवण्याचे काम सुरु होते. विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबवल्यावर हे प्रकार कमी होतील असे वाटले. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाऊ तोरसेकर, धनशाम पाटील आणि सोशल मीडियावर असलेले इतर हे सातत्याने शरद पवार यांना संपवले पाहिजे अशी भाषा करतात. त्यासाठी बॉम्बचा वाप केला पाहिजे, गोळ्या झाडल्या पाहिजेत अशी भाषाही वापरतात. ही चिथावणीखोर वक्तव्यं केल्याचं माझ्या निदर्शनास आल्याने ही तक्रार देत आहे असंही खाबिया यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 5:33 pm

Web Title: ncp chief sharad pawars murder plan ncp leader file the complaint at shivaji nagar police station scj 81 svk 88
Next Stories
1 दादा, पुढचे कार्यक्रम उशीरा ठेवा म्हणणाऱ्या आव्हाडांना अजित पवारांचे शाब्दिक चिमटे
2 चांगलं काम न केल्यास साइड पोस्टिंग; अजित पवारांनी भरला अधिका-यांना दम
3 पुण्यात ‘राजगर्जना’ नाही, पोलिसांनी बाईक रॅलीसाठी नाकारली परवानगी; कार्यकर्ते ताब्यात
Just Now!
X