िपपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या िपपरी दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या निकटवर्तीयांना पुढे पाठवून देत राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे रामराम ठोकला आहे.

मुख्यमंत्री शुक्रवारी पुण्यात होते, त्याचे निमित्त साधून शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या पदाधिकाऱ्यांचे भाजप प्रवेश करून घेतले. शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, माजी उपसभापती सविता खुळे, पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे, क्रीडा समितीचे माजी सभापती चंद्रकांत नखाते, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, राष्ट्रवादीचे नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेश तापकीर, त्यांचे बंधू हेमंत तापकीर, वाकड येथील राम वाकडकर आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांचे अनेक समर्थक इतर पक्षात आहेत. त्यांचे टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये प्रवेश करवून घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यानुसार, शुक्रवारी काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यापुढेही अनेक नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत.