पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत आणि कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर सात जण फरार आहेत. हा प्रकार मध्यरात्री नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या नातेवाईकांच्या हॉटेलवर घडला. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सनी सौदाई याचा काल वाढदिवस होता त्यामुळे हॉटेल सलोनी येथे सनीसह त्याचा भाऊ सचिन सौदाई, सुनील शर्मा, अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू आणि इतर सात जण आले होते. हे हॉटेलमध्ये उधारीवर दारु मागत होते. यासंबंधी हॉटेल मालक आणि नातेवाईक राकेश यांनी नगरसेवक डब्बू आसवानी यांना फोन करून माहिती दिली. ते तातडीने हॉटेलवर मुलासह पोहचले, तेव्हा डब्बू आसवानी यांनी अगोदर पैसे द्या आणि वस्तू घ्या असे म्हटले. मात्र, सनीसोबत असलेल्या अजय टाकने सनी भाईचा वाढदिवस असल्याने पैसे देणार नाही असे उत्तर दिले.

Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

दरम्यान, आसवानी यांचा मुलगा अमित यालाही त्यांनी शिवीगाळ केली. त्यावर भाषा नीट वापरा, असे अमितने म्हणताच त्याच्या डोक्यात आरोपीने पाण्याच्या जगने प्रहार केला. मुलाला मारताच नगरसेवक यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आसवानी आणि अमितला आरोपीने दारुच्या बाटल्या फेकून मारल्या. त्याचवेळी सचिन सौदाईसह ४ ते ५ जणांनी हॉटेलच्या बाहेर लोखंडी कोयता आणि लाकडी दांडके घेऊन उभे होते. त्यामधील एकाने तुझी विकेट टाकतो म्हणत आसवानींच्या डोक्याला पिस्तूल लावले.

त्यानंतर त्यांच्यात झटापट झाली आणि पिस्तूल आसवानी यांच्या मागील बाजूस लागले. तेवढ्यात एकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसवानींनी आरडाओरडा केल्याने सर्व आरोपी पळून गेले. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. इतर सात जणांचा शोध पोलीस घेत आहे.