News Flash

वादग्रस्त सिक्कीम दौऱ्यात राष्ट्रवादीचेच नगरसेवक

पिंपरी पालिकेच्या वतीने ठराविक कालावधीनंतर सदस्य व अधिकाऱ्यांचे अभ्यास दौरे होतात.

वादग्रस्त सिक्कीम दौऱ्यात राष्ट्रवादीचेच नगरसेवक

अभ्यासाच्या नावाखाली सहलीला गेलेल्या सिक्कीम दौऱ्याच्या विषयावरून पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच या दौऱ्यात फक्त राष्ट्रवादीच्या गोटातील नगरसेवकच सहभागी झाले व ऐनवेळी सदस्यसंख्या वाढल्याने दौऱ्याचा खर्चही साडेबारा लाखापर्यंत वाढल्याची माहिती पुढे आली आहे. अजित पवार यांचा शहरात दौरा होणार असतानाही महापौर हट्टाने या दौऱ्यात सहभागी झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापौर शकुंतला धराडे यांच्या नेतृत्वाखाली जैवविविधता समितीचे अध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, तानाजी खाडे, उल्हास शेट्टी, राजू मिसाळ, अपर्णा डोके, झामाबाई बारणे, विधी समितीच्या सभापती नंदा ताकवणे, भारती फरांदे, गोरक्ष लोखंडे, नीलेश पांढरकर, नीता पाडाळे, नारायण बहिरवाडे, अतिरिक्त तानाजी िशदे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी अशा १४ जणांची दौऱ्यासाठी नावे निश्चित करण्यात आली व त्यासाठी जवळपास साडेबारा लाख रुपये खर्चही स्थायी समितीने मंजूर केला. १३ तारखेपर्यंतच्या पाच दिवसांच्या या दौऱ्यात ऐनवेळी सदस्यसंख्या वाढली. त्यामुळे आधीचा साडेआठ लाखाचा खर्च वाढून आता साडेबारा लाख रुपये होणार आहे.
पिंपरी पालिकेच्या वतीने ठराविक कालावधीनंतर सदस्य व अधिकाऱ्यांचे अभ्यास दौरे होतात. अभ्यासाच्या नावाखाली त्या सहलीच असतात. दौऱ्यातून परतल्यानंतर काय ‘अभ्यास’ झाला, याची कधीही माहिती दिली जात नाही.
तरीही महापौरांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसांच्या सिक्कीम दौऱ्याचे नव्याने आयोजन करण्यात आले. शनिवारी (१४ मे) अजित पवार यांचा शहर दौरा आहे, तेव्हा विविध विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. त्या दृष्टिकोनातून महापौरांचे शहरात तसेच पालिकेत थांबणे अत्यावश्यक होते. मात्र, तरीही महापौर हट्टाने या सिक्कीम दौऱ्यात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2016 5:30 am

Web Title: ncp councilor on controversial sikkim tour
Next Stories
1 लेखकांमध्ये चित्रसाक्षरतेचा अभाव
2 पर्यावरण रक्षणासाठी आम्हीपण..!
3 आयटीआयच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण!
Just Now!
X