करोना प्रतिबंध लशीची सुरक्षितता, परिणामकारकतेबाबत साशंकता आणि अ‍ॅपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या लाभार्थींच्या यादीतील त्रुटी यामुळे लसीकरणास अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र राज्यभर आहे. राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेच्या ६४ टक्के लसीकरण झाले, तर मंगळवारी ५० टक्के लक्ष्य साध्य झाले. त्यानंतर बुधवारी पुन्हा यात वाढ होत ही संख्या ६८ टक्के इतकी नोंदली गेली. या साऱ्या प्रकारांना अनुसरून आज पुण्यात पत्रकारांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच एक प्रश्न विचारला.

धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांचं रोखठोक मत, म्हणाले…

अजित पवार पुण्यात असताना त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, “दादा, तुम्ही करोनाची लस केव्हा घेणार?”, असा सवाल पत्रकारांकडून करण्यात आला. त्यावर अजित पवारांनी लगेच उत्तर दिले. “लसीकरणाबाबत काही अडचणी आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाचं प्रमाण अधिक आहे. ६० ते ६५ टक्के लसीकरण झाले आहे. मात्र शहरांत २५ ते ३० टक्केच लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलत आहेत. तसेच कोविन ॲपदेखील समस्या आहे. या साऱ्या गोष्टींवर आमचे काम सुरू आहे. त्यामुळे आम्हाला जेव्हा करोनालस घेण्याची परवानगी मिळेल, तेव्हा आम्ही लस घेऊ आणि तुम्हालाही सांगू”, असं अजित पवार म्हणाले.

शिवजयंती साधेपणाने आणि उत्साहात साजरी करा, अजित पवारांचं जनतेला आवाहन

दरम्यान, ‘कोव्हॅक्सीन’ लशीला मान्यता मिळाली असली तरी इतर राज्यांमध्ये चाचणीच्या टप्प्यात आढळलेल्या दुष्परिणांमुळे आरोग्य कमर्चाऱ्यांमधील भीती अजूनही कायम आहे. त्यात मागील तीन दिवसांत लस घेतलेल्यांमधील काही जणांमध्ये ताप, अंगदुखी इत्यादी सौम्य प्रतिकूल परिणामही दिसून येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील भीती आणखी वाढली आहे. काही कमर्चारी यादीत नाव असूनही लसीकरणास येण्यास तयार नाहीत. यासाठी आता प्रत्येक लसीकरण केंद्रावर जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली जात आहे.

“मुंबईकर वाहतुकीचे नियम पाळतात पण पुणेकर थोडे धीट आहेत”

पुण्याच्या स्थानिक राजकारणाबाबतही अजित पवार यांनी माहिती दिली. “पुण्यातील १९ नगरसेवक संपर्कात आहेत. काही जण वारे बदलते तसे बदलतात. काहींना त्यांची विकासकामे करून घ्यायची असतात. हे सारे बेरजेचे राजकारण असतं. त्यात इलेक्टिव्ह मेरिटदेखील बघायचं असतं”, असं त्यांनी सांगितलं.