25 September 2020

News Flash

या लोकांना पुन्हा निवडून दिले तर तुम्हाला ब्रम्हदेवही वाचवू शकणार नाही – अजित पवार

३० दिवसात आचारसंहिता लागणार असताना हंगामी अर्थ संकल्प सादर करायचा असताना मोदी सरकारने पूर्ण अर्थसंकल्प मांडला हा राजकीय, नैतिक भ्रष्टाचार आहे.

३० दिवसात आचारसंहिता लागणार असताना हंगामी अर्थ संकल्प सादर करायचा असताना मोदी सरकारने पूर्ण अर्थसंकल्प मांडला हा राजकीय, नैतिक भ्रष्टाचार आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी लोणी काळभोर येथील जाहीर सभेत केला.
पाच लाख कोटीचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे. रोज २ हजार कोटीचा तोटा येत आहे. कुठल्या रस्त्याने देश चालला आहे असा सवाल करतानाच मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने दयनीय अवस्था केली आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पवार साहेबांचा फायदा इथल्या लोकांना झाला आहे. परंतु मोदी लाटेत मोठा फटका बसला. लॉलीपॉप दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असते आम्हाला चांगले वाटले असते. परंतु हेही सरकारला कळायला मार्ग नाही. हा अर्थसंकल्प मोदी सरकारचा अंतिम संस्कार ठरणारा अर्थसंकल्प ठरणार आहे असा इशारा अजितदादा पवार यांनी दिला.

१७ हत्या पुण्यात झाल्या आहेत. कुठय कायदा व सुव्यवस्था अबाधित. आमच्या काळात असे प्रकार घडले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या दरारा राहिला नाही.विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा बलात्कारामध्ये तिसरा नंबर लागतो. काय म्हणावं मानसिकतेला असा सवाल अजितदादा पवार यांनी केला.

पुण्यातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बलात्कार, विकासकामे या विषयांना हात घालताना अजितदादा पवार यांनी भाजपाच्या कारभाराचा आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. लोकसभेच्या निवडणुकीत नीट विचार करा. या लोकांना पुन्हा निवडून दिले तर तुम्हाला ब्रम्हदेवही वाचवू शकणार नाही हे लक्षात घ्या असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

पंतप्रधानांकडून लोकशाहीची बुज राखली गेली नाही – जयंत पाटील
लोकसभेमध्ये ज्यांनी कमी वेळ घालवला त्या पंतप्रधानांकडून लोकशाहीची बूज कशी राखली जाईल असा सवाल प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला. यापूर्वी कधी सरकारची छबी सांगण्यासाठी खर्च करण्यात आला नव्हता परंतु आताच्या सरकारने ४८०० कोटी रुपये स्वतः ची छबी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी खर्च केला आहे असा आरोपही आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

या देशात प्रसारमाध्यमे ताब्यात घेण्याची सुसूत्रता या सरकारने आखली आणि यापलीकडे जात जे विरोधात दाखवतात किंवा छापतात त्या त्या वृत्तपत्राच्या मालकाला खिशात घालण्याचे काम केले. विशेष म्हणजे त्यांच्यातील शेअर्स विकत घेवून मालक बनण्याचा प्रकार मोदी सरकारने पाच वर्षात केल्याचेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर यशस्वी कसे झाले हे प्रचाराला येणाऱ्या भाजपच्या लोकांना यशस्वी कसे झाले याची विचारणा करा.

उत्तम मार्केटिंगमध्ये नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळाला आहे. हीच मार्केटींग २०१४ मध्ये केली म्हणून देश आणि देशातील जनता फसली आहे. खरी माहिती येवू नये असा प्रकार भाजपचे बगलबच्चे सध्या करत असतात. आज एका राष्ट्रीय सर्व्हेमध्ये बेरोजगारी वाढल्याचा मुद्दा समोर आला आहे. नरेंद्र मोदी यांचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही आमदार जयंतराव पाटील म्हणाले.

मतभेद बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणा असे आवाहन आमदार जयंतराव पाटील यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी भाजपची खोटी आश्वासने, घोटाळे याबाबतची माहितीची व्हिडिओ क्लीप दाखवून जनतेचा प्रतिसाद घेत असून त्यांच्या या संकल्पनेला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

तिसऱ्या टप्प्याच्या सहाव्या दिवसातील दुसरी सभा पुणे – लोणी काळभोर येथे तुफान गर्दीमध्ये पार पडली. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,खासदार वंदना चव्हाण, युवा नेते रोहित पवार, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार अशोक थोरात, माजी आमदार विलास लांडे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, आदींसह लोणी काळभोर, हवेली येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 8:47 pm

Web Title: ncp leader ajit pawar slams bjp
Next Stories
1 अर्थसंकल्पातून गाजरांचा ढीगच ढीग बाहेर पडला – छगन भुजबळ
2 राज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही – आनंद तेलतुंबडे
3 दोन मोबाइल चोरट्यांना पोलिसांकडून अटक
Just Now!
X