26 September 2020

News Flash

अर्थसंकल्पातून गाजरांचा ढीगच ढीग बाहेर पडला – छगन भुजबळ

स्मार्ट सिटी बनवतो सांगितले. परंतु चार वर्षे होवून गेली एकतरी स्मार्टसिटी झाल्याचे पहायला मिळाली का ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला.

स्मार्ट सिटी बनवतो सांगितले. परंतु चार वर्षे होवून गेली एकतरी स्मार्टसिटी झाल्याचे पहायला मिळाली का ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला. निव्वळ पुण्यातच नाही तर अख्ख्या देशात खूनाचे सत्र सुरु आहे. जातीपातीमध्ये लढवले जात असल्याचेही आमदार छगन भुजबळ म्हणाले.

गाजरांचा ढीगच ढीग अर्थसंकल्पातून बाहेर पडला आहे. अहो चहा २० रुपयाला मिळतो आणि हे दिवसाला १७ रुपये शेतकऱ्यांना देणार आहेत. असेही आमदार छगन भुजबळ म्हणाले. नोटाबंदीने आतंकवाद संपेल असे सांगण्यात आले. आतंकवाद संपला नाही उलट अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आपने एक मारा तो हम दस मारेंगे बोलले परंतु एक तरी मारला का उलट आपले सैनिक शहीद होत आहेत आज ही अवस्था आहे असेही आमदार छगन भुजबळ म्हणाले. योगी और मोदी का एकच नारा न बसा घर हमारा न बसने देंगे तुम्हारा अशा शब्दात आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली.

ओबीसी महामंडळाला एक रुपया दिला अद्यापपर्यंत दिलेला नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे अजून दिलेले नाही. निवडणुकीत जातीजाती मध्ये हिंदू मुस्लीम अशी दंगल घडवण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे तुमचं डोकं शांत ठेवा. डोकं शांत ठेवलं नाही तर पुन्हा दंगलीच्या माध्यमातून सत्तेवर येतील. त्यामुळे सावध व्हा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले. ते बुलेटने हल्ला करतील परंतु आपण त्यांना बॅलेटने उत्तर देवू असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले. यांना शेतकऱ्यांचे… विद्यार्थ्यांचे… बेरोजगारांचे अश्रू पुसता येत नाही. हे तुमचं माझं नाही त्यामुळे रयतेचं राज्य आणूया असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी शेवटी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 8:41 pm

Web Title: ncp leader chhagan bhujbal slams bjp
Next Stories
1 राज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही – आनंद तेलतुंबडे
2 दोन मोबाइल चोरट्यांना पोलिसांकडून अटक
3 १४ मांजरी, सात कुत्र्यांच्या हत्येची माहिती देणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपये इनाम
Just Now!
X