अजून आठवते – अंकुश काकडे

अंकुश काकडे हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते १९८८ मध्ये पुण्याचे महापौर होते. म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद भूषविलेले काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत.

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
maval lok sabha mahayuti marathi news, shrirang barne latest news in marathi
श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम

मूळच्या जनसंघाच्या, पण जनता पक्षातर्फे उभ्या असलेल्या मालतीबाई परांजपे यांच्याविरोधात मी १९७९ मध्ये महापालिका निवडणूक लढविली होती. मालतीबाई विद्यमान नगरसेवक, तर मी कार्यकर्ता असलो तरी उमेदवार म्हणून अगदीच नवखा होतो. मालतीबाई यांचे भरीव काम असल्याने स्वाभाविकच त्या विजयी झाल्या. त्यानंतर घरी जाऊन मी मालतीबाई यांची भेट घेतली. तेव्हा ‘मी निवडून आले याचा आनंद तर आहेच, पण त्यापेक्षा तुझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांचा पराभव झाला याचे दु:ख अधिक आहे’, असे त्या मला म्हणाल्या. त्यानंतर मी तीन वेळा नगरसेवक आणि महापौरही झालो. पण प्रतिस्पर्धी उमेदवारालाही आपल्या पराभवाचे दु:ख झाले हा प्रसंग माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील.

राजकीय जीवनात कार्यकर्ता म्हणून मी १९६८ पासून काम करीत आहे, मात्र अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे मला पहिल्या निवडणुकीने शिकविले. त्या निवडणुकीमध्ये मी नागरी संघटनेतर्फे लढावे असा आग्रह निळूभाऊ लिमये यांनी धरला होता. मात्र, अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे मी त्यांना सांगितले. नंतर नागरी संघटनेने मला पुरस्कृत करून पाठिंबा दिला होता. लोकमान्यनगर, नवी पेठ परिसरात मी १९८५ मध्ये पुरोगामी लोकशाही दलातर्फे (पुलोद) नगरसेवक म्हणून निवडून आलो त्या वेळी अ‍ॅड. नंदू फडके विरोधी उमेदवार होते. याच कारकीर्दीत १९८८ मध्ये पुण्याच्या महापौरपदाची मला संधी मिळाली. १९९२ मध्ये मी मॉडेल कॉलनी येथून निवडणूक लढवली होती. त्या वेळी माझे चुलत मेहुणे प्रमोद महाले हे अपक्ष उभे होते. एकीकडे पती, तर विरोधात भाऊ अशी परिस्थिती असल्याने माझ्या पत्नीची कुचंबणा झाली. तिच्या माहेरचे सारे महाले यांच्या प्रचारात होते. या काळात थोडी कटुताही आली होती, पण यथावकाश सारे मावळले.

मॉडेल कॉलनीतील माझा वॉर्ड इतर मागासवर्ग गटासाठी राखीव झाल्याने १९९७च्या निवडणुकीत मी पुन्हा मूळ वॉर्डात परतलो. तो वॉर्ड महिला राखीव झाल्यामुळे तेथून वंदना चव्हाण विजयी झाल्या. मी शेजारच्या वॉर्डातून उमेदवारी मागितली, तर तेथे १७ जण इच्छुक होते. एवढेच नव्हे तर अंकुश काकडे यांना वगळून १६ पैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी सर्वानी केली होती. मात्र, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि निवडणुकीत माझा विजय झाला. नंतरची निवडणूक प्रभाग पद्धतीने व्हावी असा आग्रह धरणाऱ्यांपैकी मी एक होतो. मात्र, २००२ साली प्रभाग पद्धतीमध्ये काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि श्याम मानकर यांच्यासह भाजपचे बाळासाहेब किरवे निवडून आले. राष्ट्रवादीचे पॅनेल पडले. २००७च्या निवडणुकीत पक्षाने जाहीरनामा करण्याची तसेच प्रचाराची धुरा माझ्यावर सोपविल्याने मी निवडणूक लढवली नाही.

महापालिकेतील कामाच्या अनुभवाच्या बळावर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून तीनदा निवडणूक लढवली होती. १९८० मध्ये मी अरस काँग्रेसतर्फे निवडणूक लढलो तेव्हा भाजपचे अण्णा जोशी आमदार झाले. काँग्रेसच्या तिकिटावर १९९० मध्ये लढलो त्या वेळी शिवसेनेचे शशिकांत सुतार आमदार झाले. तर, राष्ट्रवादीतर्फे १९९९ मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र त्या वेळी काँग्रेसच्या उमेदवार वंदना चव्हाण रिंगणात असल्याने मतविभाजन होऊन शिवसेनेचे विनायक निम्हण विजयी झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून कार्यरत आहे.

(शब्दांकन:विद्याधर कुलकर्णी)