पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना आज मंगळवारी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. अनिल भोसले, सूर्याजी जाधव, कैलास भोसले आणि तानाजी पडवळ या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ जणा विरोधात ठेवीदारांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या प्रकरणी संबधीतावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर रिझर्व्ह बँकेकडून २०१८/१९ या वर्षाचे ऑडिट केले. त्यामध्ये तब्बल ७१ कोटीं ७८ घोटाळा झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर बँकेचे व्यवहाराची सर्व बाजूने चौकशी सुरू असताना. आज आर्थिक गुन्हे शाखे मार्फत बँकेतील घोटाळ्या प्रकरणी संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक केली. आता या सर्व आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात उद्या बुधवारी हजर केले जाणार आहे.