23 March 2019

News Flash

पोलीस अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा; पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने तरुण गंभीर जखमी

पुण्यातील एका मंदिर परिसरात घडली घटना

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील एका मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या सर्विस पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. बिबवेवाडी परिसरातील मंदिरात ही खळबळजनक घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश कांबळे असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधीत पोलीस अधिकारी बिबवेवाडी येथील व्हीआयटी कॉलेजजवळील एका मंदिरात दर्शनासाठी गेला होता. या ठिकाणी नमस्कारासाठी तो खाली वाकल्यानंतर त्याच्या कमरेला लावलेल्या सर्विस पुस्तुलातून अचानक गोळी सुटली. ही गोळी जवळच उभ्या असलेल्या गणेश कांबळे या तरुणाच्या दिशेने जात त्याच्या पोटात घुसली. या दुर्घटनेमध्ये गणेश गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

जखमी झालेल्या तरुणाच्या प्रकृतीबाबत माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र, निष्काळजीपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई होते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

First Published on March 22, 2018 1:00 pm

Web Title: negligence of police officer youth seriously injured after shooting a pistol accidentally