News Flash

पुण्याच्या नेहा नारखेडे यांचा ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश

गेल्या वर्षी ‘फोर्ब्स’च्याच ‘५० टेक वूमन’च्या यादीत त्या झळकल्या होत्या.

नेहा नारखेडे

पुणे : प्रतिष्ठित ‘फोर्ब्स’ने अमेरिकेतील ‘रिचेस्ट सेल्फमेड वूमन अंडर ४०’ अर्थात चाळीस वर्षांखालील स्वकर्तृत्त्वावर श्रीमंत झालेल्या महिलांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात विख्यात टेनिसपटू सेरेना विल्यम्स, मॉडेल-अभिनेत्री किम करदाशियाँ यांच्यासह मूळच्या पुण्याच्या असलेल्या नेहा नारखेडे यांनी स्थान मिळवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

पुण्यातील पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून (पीआयसीटी) अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर नेहा यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर ‘लिंक्ड इन’ या संकेतस्थळाच्या कंपनीत त्यांनी काम केले. त्यांनी योगदान दिलेले ‘अपाचे काफ्का’ हे सॉफ्टवेअर जगभरात गाजले. पुढे त्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांबरोबर ‘कॉन्फ्युएंट’ या कंपनीची स्थापना केली. सध्या त्या या कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून  कार्यरत आहेत. या यादीत त्यांच्या नावावर आठ गुण असून, वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांची संपत्ती ३६ कोटी डॉलर्स असल्याचे ‘फोर्ब्स’ने नमूद केले आहे.

गेल्या वर्षी ‘फोर्ब्स’च्याच ‘५० टेक वूमन’च्या यादीत त्या झळकल्या होत्या. तसेच अमेरिकेतील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय वंशाच्या चार प्रभावशाली महिलांमध्येही त्यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 5:00 am

Web Title: neha narkhede from pune name in forbes lis zws 70
Next Stories
1 पुण्यात पावसाने जूनची सरासरी ओलांडली
2 उद्योगनगरीत आठ वर्षांत वायूगळतीच्या ४१७ घटना
3 शहरबात : पीएमपीचा प्रवासी दिन उपक्रमापुरताच
Just Now!
X