पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ३६६ रुग्ण आढळल्याने, १ लाख ५७ हजार ४१७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६९८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ४३ हजार ९२७ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २०८ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, २६३ जण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८५ हजार ५१८ वर पोहचली असून पैकी ८१ हजार ३७० जण करोनातून बरे झाले आहेत. सध्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९४८ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.