पुण्यातील गुंड गजानन मारणे हा खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी मारणेला ताब्यात घेतलं आहे. गजानन मारणे ला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संबधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती रात्री दहाच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना दिली आहे.

पुण्यात मागील काही वर्षात टोळी युद्ध मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडावर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करीत कारागृहात रवानगी केली होती. त्याच दरम्यान अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एकाच्या या खुनाच्या प्रकरणी गुंड गजानन मारणे याला मोक्का अंतर्गत कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. या खूनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा कारागृहाबाहेर त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास ३०० हून अधिक चारचाकी वाहने घेऊन मिरवणूक काढण्यात आली. कारागृहापासून थेट पुण्यापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफा घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यात मारणे पुण्यात पोहचला.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

या जंगी मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची माहिती दुपारीच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असल्याचं देसाई यांनी म्हटलं होतं.