25 February 2021

News Flash

मजबूत रस्त्यांसाठी नवे तंत्र विकसित

प्रा. राजशेखर राठोड यांचे संशोधन

संग्रहित छायाचित्र

प्रा. राजशेखर राठोड यांचे संशोधन

पुणे : महाराष्ट्रातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. प्रा. राजशेखर राठोड यांनी महाराष्ट्राच्या काळ्या मातीच्या अभियांत्रिकी आणि भौतिक गुणधर्मात बदल करून एक मिश्रण तयार के ले आहे. या मिश्रणाचा रस्ते निर्मितीमध्ये वापर के ल्यास मजबूत रस्ते तयार करणे शक्य आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रा. राजशेखर राठोड यांनी ‘स्टॅबिलाझेशन ऑफ ब्लॅक कॉटन सॉईल युजिंग क्रशड सँड अँड लाईम’ या विषयावरील संशोधनासाठी दाखल के लेला भारतीय एकस्व अधिकाराचा (पेटंट) प्रस्ताव सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून प्रकाशित झाला आहे. गेली साडेतीन वर्षे प्रा. राठोड या संदर्भातील संशोधन करत आहेत. त्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर रवांदे यांनी त्यांना मार्गदर्शन के ले.

प्रा. राठोड यांनी या संशोधनाची माहिती दिली. ‘महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काळी माती आढळत असल्याने रस्ते निर्मिती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. रस्ता तयार करताना त्यात वेगवेगळे थर असतात. मात्र मजबूत रस्त्यासाठी पाया पक्का असणे आवश्यक आहे. रस्ता तयार करण्यासाठी मुरुमाचा वापर के ला जातो. मुरूम खर्चिक असतो, त्याशिवाय वाहतूक खर्चामुळे किं मतही वाढते. त्यामुळे महाराष्ट्रातील मातीचा अभ्यास करून मजबूत रस्ते बांधणीचे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न सुरू के ला. काळ्या मातीच्या अभियांत्रिकी आणि भौतिक गुणधर्मात बदल करून त्यात चुना आणि क्रश्ड वाळूचा वापर करून एक मिश्रण तयार केले. याचा उपयोग काळ्या मातीच्या भागात रस्त्याचा पाया पक्का होऊन मजबूत रस्ते निर्मिती करता येऊ शकते. क्रश्ड वाळू आणि चुना यांच्या मिश्रणातून हे शक्य झाले आहे. परिणामी राज्यातील सर्वच भागात मजबूत रस्ते निर्मितीसाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.

मजबूत रस्त्यांसाठी विकसित के लेले तंत्र राज्य आणि के ंद्र शासनाला सादर करता येऊ शके ल. जेणेकरून या तंत्राचा रस्तेनिर्मितीमध्ये वापर होऊ शके ल.

– प्रा. राजशेखर राठोड, संशोधक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 1:51 am

Web Title: new techniques developed for strong roads zws 70
Next Stories
1 साहित्य संस्थांचे अनुदान करोनामुळे ठप्प
2 पुण्यात एकाच दिवसात 202 नवे करोना रुग्ण, पिंपरीत 138 नवे रुग्ण
3 पुण्यातले २० कोटींचे मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणाचे गुजरात कनेक्शन
Just Now!
X