पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १५१२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ३३० एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ३ हजार २५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १३२८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख १६ हजार ६२६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना दिलासा

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने ७८४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १ हजार ५५९ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७३ हजार २६०वर पोहचली असून यांपैकी, ५९ हजार ५४४ जण करोनातून बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ६३ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.