11 November 2019

News Flash

नवविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडच्या वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडच्या वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली. रमेश उत्तम तरकसे अस आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणाचे नाव आहे. रमेशला गेल्या सात वर्षांपासून दारूचे व्यसन होते अशी माहिती समोर येत आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, नुकताच तीन महिन्यापूर्वी रमेशचा विवाह झाला होता. रमेश हा मूळ मराठवाड्यातील असून तो पिंपरी-चिंचवड मध्ये पेंटिंगचे काम करत होता. शुक्रवारी रात्री पेंटिंगचे काम झाल्यानंतर त्याने मद्यपान केले आणि घरी आला. पिंपरी-चिंचवडमध्ये रमेश हा पत्नीसह राहात होता. पहाटेच्या सुमारास रमेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी पत्नी घरात होती.

पत्नी झोपेत असताना रमेशने हे पाऊल उचलले. पत्नीला जाग आली तेव्हा समोरचे दृश्य बघून तिला धक्का बसला. तिने लगेच शेजारी राहणाऱ्या दिराला माहिती दिली. रमेशला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, मात्र त्याला डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

First Published on July 14, 2018 7:14 pm

Web Title: newly married youngster suicide
टॅग Pune,Suicide