राज्यात पुण्यासह इतर ठिकाणी पुढील ७२ तास विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यपी म्हणाले की, पुणे शहरात आज, उद्या आणि परवा म्हणजे १२ तारखेपर्यंत दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा शक्यता आहे. त्यानंतर १३ते १६ तारखेपर्यंत पावसाचा जोर कमी होईल. मात्र त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता देखील असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात २५ तासात ११० ठिकाणी कोसळल्याच्या घटना 

पुणे शहरात काल सायंकाळी ६ वाजल्यापासून आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ११०  ठिकाणी मागील २५  तासात झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.