11 August 2020

News Flash

आयसिसचे दहशतवादी असल्याच्या संशयावरून पुण्यात दोघांना अटक

दिल्लीच्या एनआयए आणि एटीएस यांनी रविवारी पुण्यात संयुक्त कारवाई केली.

दिल्लीच्या एनआयए आणि एटीएस यांनी रविवारी पुण्यात एकत्र कारवाई केली आहे. पुण्यातील येरवाडा आणि कोंडवा येथून दोन महिलांना अटक केली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशयाखाली अटक करण्यात आली आहे. नाबील सिद्दीकी खत्री (२७ वर्ष) आणि सादिया अनवर शेख (२१ वर्ष)असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नाबील सिद्दीकी खत्री आणि सादिया अनवर शेख यांना ISIS म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया या दहशतवादी संघटनेशी संबध असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलं आहे. दोघेही या दहशतवादी संघटसाठी काम करत असून ते सध्या सक्रीय होते, असा संशय आहे.

या प्रकरणाचा आधिक तपास सुरू असून या दोघांना दिल्ली येथील एनआयए न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज, दुपारी एक वाजता त्यांना पुण्यातून विमानाने घेऊन जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 7:24 am

Web Title: nia in joint operation alongwith ats pune arrested nck 90
Next Stories
1 पुण्यात खरेदीसाठी झुंबड
2 करोनाची संसर्गसाखळी तोडण्यातील उणिवा स्पष्ट
3 पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, एमआयडीसी सुरू राहणार; आयटी कंपन्यांना 15 टक्के कामगारासह मुभा
Just Now!
X