News Flash

‘एनआयए’चा हनी बाबूंच्या निवासस्थानी छापा

या कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच काही कागदपत्रे जप्त केली.

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण तसेच एल्गार परिषद प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू यांचे मणीपूरमधील बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले. हनी बाबू यांच्या उत्तरप्रदेशातील नोएडा येथील निवासस्थानी ‘एनआयए’च्या पथकाने रविवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच काही कागदपत्रे जप्त केली.

प्रा. बाबू हे मणीपूरमधील कांगेपाक कम्युनिस्ट पार्टीचा नेता पैकखोंबा मेट्टी याच्या संपर्कात असल्याचे  उघड  झाले आहे. मणीपूरमधील माओवादी संघटनेवर बंदी  घालण्यात आली आहे, असे ‘एनआयए’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात हनी बाबू यांना ‘एनआयए’ने २८ जुलै रोजी अटक केली. याप्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी हनी बाबू यांच्या निवासस्थानी ‘एनआयए’च्या पथकाने छापा टाकला. रोना विल्सन, आनंद तेलतुंबडे, वरावरा राव, सुरेंद्र गडलिंग यांनी एक समिती स्थापन केली होती. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे प्रमुख डॉ.जी. एन. साईबाबा यांना गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. साईबाबा यांच्या सुटकेसाठी ही समिती काम करत होती, अशी माहिती तपासात मिळाली. शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार करण्यात अटकेत असलेल्या आरोपींबरोबर हनी बाबू सक्रिय होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

माओवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी निधी संकलनाचे काम केले, तसेच मणीपूर येथील बंदी घातलेल्या माओवादी संघटनेबरोबर त्यांचे संबंध असल्याचे तपासात  उघड  झाले आहे, असे ‘एनआयए’ने  म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 4:28 am

Web Title: nia raids honey babu residence zws 70
Next Stories
1 परीक्षांसाठी ‘एमपीएससी’ची लगबग
2 पावसाची नवी तारीख.. ६ ऑगस्ट!
3 धक्कादायक! पुण्यात दिवसभरात १७६२ करोनाबाधित आढळले, ३१ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X