शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे (वय-८६) आज (शनिवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, मुलगी व नातवंड असा परिवार आहे. पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका व लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अकादमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत.

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘वनस्थळी’ या संस्थेच्या त्या संस्थापिका होत्या. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी  काम केल. १९८१ ला त्यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना करुन महिलांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि रोजगारासाठीच प्रशिक्षण यासाठी काम सुरू केलं. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखन देखील केलं. ‘स्नेहयात्रा’ हे त्यांच प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी असुनही त्यांनी आयुष्यभर स्वतच वेगळं व्यक्तिमत्व आणि लेखन शैली जोपासली.  मागिल काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही अलिप्त होत्या. अखेर शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

विद्यार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यामातूनही निर्मलाताईंनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या सामाजिक व शैक्षिणक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शिवाय ‘आदिशक्ती’ आणि ‘सावित्रीबाई’ पुरस्काराने देखील त्यांना गौरवल्या गेले आहे.