News Flash

पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांचे फोटो काढणाऱ्याला मिळणार पैसे

‘देशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे.

‘देशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. येत्या काळात रस्त्यावर नियम मोडून वाहन पार्क केल्याचे छायाचित्राद्वारे कळवणाऱ्या व्यक्तीला, नियमभंग करणाऱ्याकडून जो दंड वसूल केला जाईल, त्या दंडाच्या २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्या बाबतचा कायदा लवकरच अमलात येईल,’ असे सूतोवाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठातर्फे ‘लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, डॉ. श्रवण कडवेकर, डॉ. रामानुजन आदी या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, की आजकाल पार्किंगसाठी जागा मिळत नाही. दिल्लीत माझ्या कार्यालयाच्या बाहेर पार्किंगसाठी जागा नसल्याने ही समस्या सोडवण्यासाठी ईझी पार्क ही तंत्रसुसज्ज पार्किंग इमारत उभारण्यात आली. आता एनएचआयडीसीच्या माध्यमातून मोठय़ा शहरांमध्ये अशा ५० पेक्षा अधिक इमारती उभारण्यात येत आहेत. त्याचा व्यावसायिक वापरही होईल. बसस्थानकांमध्ये उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करून तेथे ‘बस पोर्ट’ उभारण्यात येईल. बस पोर्टला दळणवळण सोयींनी जोडले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:32 pm

Web Title: nitin gadkari parking rules in india mppg 94
Next Stories
1 भाजपात गेलेले आणि काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात – जयंत पाटील
2 भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं लक्ष्य – राजू शेट्टी
3 किशोरवयीन मुलांची व्यसनाधीनता रोखण्यासाठी ‘संयम’ 
Just Now!
X