शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्टता नाही
पुणे : राज्यातील अकरावीच्या प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा २१ ऑगस्टला घेण्याची घोेषणा राज्य शासनाने के ली आहे. मात्र अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाने अद्याप काहीच माहिती जाहीर के लेली नसल्याने पालक-विद्यार्थ्यांमध्ये या प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम आहे. त्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होणार का, संस्थास्तरावरील राखीव जागा (इनहाउस कोटा) असणार का, प्रवेशांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह््य धरणार की सीईटीचे गुण, असे काही प्रश्न पालक-विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता राज्य मंडळातर्फे  अकरावीच्या प्रवेशांसाठीची सीईटी २१ ऑगस्टला घेण्यात येणार आहे. अकरावीची सीईटी झाल्याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश देऊ नये, असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. मात्र प्रवेश प्रक्रिया दरवर्षीप्रमाणेच होणार की यंदा त्यात काही बदल होणार, याची माहिती दिलेली नसल्याने पालक-विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. त्यामुळे प्रवेशांबाबतची माहिती मिळवण्यासाठी पालक कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क  साधत आहेत. शिक्षण विभागाने अद्याप माहितीच दिलेली नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयांकडूनही माहिती देण्याबाबत हात वर के ले जात असल्याचे दिसून येत आहे.

शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेतली जाणार आहे. पण प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाणार, कधी राबवली जाणार याबाबत काहीच माहिती नाही.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत काहीही बदल के लेला नाही. गेल्यावर्षी प्रमाणेच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया होईल, ग्रामीण भागात महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया होईल. अकरावीची प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षीप्रमाणेच संस्थास्तरावरील राखीव जागांवर (इनहाउस कोटा) प्रवेश प्रक्रिया होईल. अकरावीच्या प्रवेश अर्जांमध्ये विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याबाबतचा पर्याय दिला जाईल. सीईटी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असली, तरी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना मनासारखे महाविद्यालय, शाखा मिळण्यात काही प्रमाणात अडचण येऊ शकते. – दिनकर टेमकर,  संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय