News Flash

राज्यात यापुढे लॉकडाउन नाही, राजेश टोपे यांची मोठी घोषणा

पुण्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

संग्रहीत छायाचित्र

राज्यात यापुढे लॉकडाउन असणार नाही तर अनलॉक दोन आणि तीन असणार आहे अशी मोठी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केली आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत याची चिंता फारशी नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढते आहे त्याची चिंता जास्त आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

जुलै आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन आयसीयू बेड्स आणि डॉक्टर्स म्हणजेच आपले करोना योद्धे यांची संख्या वाढवत आहोत. एवढंच नाही तर राज्यातील करोना मृत्यू आम्ही लपवत नाही असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. करोनाचा मृत्यूदर वाढणार नाही याचीही काळजी आम्ही सर्वतोपरी घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

जुलै ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या वाढू शकते अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली. पुणे आणि सोलापुरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख आढावा घेत आहोत असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी १ लाख अँटी जेन चाचण्या घेण्यात येणार आहेत त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा टोपे यांनी यावेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 8:17 pm

Web Title: no lockdown in maharashtra big announcement by minister rajesh tope in pune scj 81 svk 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाचे मृत्यू दडवले जात असल्याच्या आरोपावर आरोग्यमंत्री टोपेंनी दिलं उत्तर
2 पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या १६ हजाराहून अधिक जणांवर कारवाई
3 Coronavirus : प्रत्येक माहिती नागरिकांना मोबाइलवर द्या – शरद पवारांची सूचना
Just Now!
X