“महाराष्ट्रातील सध्याची पारिस्थती बघता, ज्या वेगाने करोनाच्या केसेस वाढत आहेत. त्यानुसार फार सतर्क राहावे लागणार आहे. अधिक मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. तसेच पुन्हा लॉकडाउनपेक्षा यातून पुढे कसे जाता येईल आणि करोनाला कसे रोखता येईल हा प्रयत्न करावा लागेल”, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा आढावा घेत त्यांनी स्थानिक प्रशासनाचे आणि करोना योद्ध्यांचे कौतुक केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत कशाप्रकारे कोविड विरोधात लढाई चालले आहे. हे सर्व समजून घेतलेले आहे. वेगवेगळे प्रयत्न हे महानगरपालिका करत आहेत. काही प्रमाणात त्याला यशही येत आहे. पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. पावसाळ्यात जास्त वाढतील असा अंदाज आहे. त्या दृष्टीने येथील महानगरपालिका प्रशासन तयारी करत आहे. महानगरपालिकेचा डॅश बोर्ड चांगला असून मॅनेजमेंट करणं सोपं जाईल. महाराष्ट्रातील सध्याची पारिस्थती बघता ज्या वेगाने केसेस वाढत आहेत, फार सतर्क राहावे लागणार आहे. अधिक मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतील.  असं  फडणवीस म्हणाले.

“पुन्हा लॉकडाउन होईल अशी पारिस्थती दिसत नाही. नागरिकांची तशी मानसिकता देखील नाही, नागरिकांमध्ये जनजागृती वाढवली पाहिजे. करोना अधिक वाढू नये यासाठी लॉकडाउन नसतानाही कोविडच्या संबंधी जे प्रोटोकॉल आहेत ते कसे पाळता येतील याच्यावर जास्त भर द्यावा लागेल. म्हणून, पुन्हा लॉकडाउनऐवजी यातून पुढे कसे जाता येईल आणि कोविड रोखता करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल” असेही फडणवीस म्हणाले.