25 February 2021

News Flash

शहर, जिल्ह्य़ात मृतांची संख्या वाढल्याने स्वाइन फ्लूबाबत जिल्हा प्रशासन गंभीर!

पुणे शहर व जिल्ह्य़ात ‘स्वाइन फ्लू’मुळे झालेल्या मृतांची संख्या ५० वर पोहोचली असल्याने जिल्हा प्रशासन गंभीर झाले असून, त्यानुसार विविध पावले उचलण्यात येत आहेत.

| March 17, 2015 03:30 am

पुणे शहर व जिल्ह्य़ात ‘स्वाइन फ्लू’मुळे झालेल्या मृतांची संख्या ५० वर पोहोचली असल्याने जिल्हा प्रशासन गंभीर झाले असून, त्यानुसार विविध पावले उचलण्यात येत आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्य़ामध्ये २२२ उपचार केंद्रे कार्यरत झाली आहेत. त्याचप्रमाणे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्य़ामध्ये जिल्ह्य़ातील २०५ औषध विक्रेत्यांकडे टॅमी फ्लू गोळ्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक औषध विक्रेत्याने आपल्या भागातील दुसऱ्या कोणत्या औषध विक्रेत्याकडे टॅमी फ्लू गोळ्या मिळतील यासंदर्भातील फलक लावावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी ही माहिती दिली. राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एनआयव्ही) संचालकांनी स्व्ॉप चाचणीचा आग्रह न धरता स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना टॅमी फ्लू द्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लू उपचाराची केंद्रं आणि टॅमी फ्लू गोळ्यांचा साठा उपलब्ध करून देणाऱ्या औषध विक्रेत्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागात १२० तर, शहरामध्ये १०२ अशा २२२ ठिकाणी स्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पुणे महापालिका हद्दीमध्ये ५४, तर िपपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये ४८ ठिकाणी उपचार होणार आहेत. हवामानामध्ये बदल झाला असून विदर्भातील अकोला, नांदेड, नागपूर या ठिकाणचा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव ओसरला आहे. तेथून टॅमी फ्लू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असल्याचेही सौरभ राव यांनी सांगितले.
महापालिकेने केलेल्या मॅिपगच्या आधारे घरोघरी जाऊन माहिती घेण्यात येणार आहे. गरोदर माता, वयस्कर व्यक्ती, अस्थमा असलेले रुग्ण यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. १०८ क्रमांकाच्या सेवेचा लाभ खासगी व्यक्तीदेखील घेऊ शकणार आहेत. शहरातील शाळांचे मुख्याध्यापक आणि नगरसेवक यांचे ‘काय करावे आणि काय करू नये’ (डूज अँड डोन्ट डूज) याविषयी प्रबोघन करण्यात येणार असल्याचेही सौरभ राव यांनी सांगितले.

‘लक्षणे असलेल्यांनीच मास्क वापरावा’
शाळांतील मुलांनी सरसकट मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या शालेय मुलांनीच मास्क वापरावा, असे निर्देश आरोग्य विभागानेच दिले आहेत. ज्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती आणि औषधोपचारांनी ते बरे झाले आहेत, अशा मुलांनी मास्क वापरावा, असे सौरभ राव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 3:30 am

Web Title: no of swine flu death increasing
Next Stories
1 ‘टॅमी फ्लू’ गोळ्यांसाठीच्या हेल्पलाईनवर सात दिवसांत तब्बल चार हजार दूरध्वनी!
2 विद्यापीठाचा प्रवास १७ लाखांपासून ६०० कोटी रुपयांपर्यंत
3 ‘गीतरामायणा’चे शिवधनुष्य युवा कलाकारांनी पेलले
Just Now!
X