पुणे : पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (१० सप्टेंबर) विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग

’ पर्वती जलकेंद्र- सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड , डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता, पद्मावती.

’ वडगाव जलकेंद्र -हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक

’ चतु:शृंगी -एसएनडीटी, वारजे, पाषाण, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, पॉप्युलरनगर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी आणि भूगाव रस्ता.

’ लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग केंद्र- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, कोरेगाव पार्क, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, कल्याणीनगर, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर आणि नगर रस्ता.