News Flash

वाघोली, खराडी, लोहगाव भागात उद्या पाणीपुरवठा नाही

वाघोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीची तातडीची दुरुस्ती करावी लागणार असल्यामुळे या योजनेतून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (२० जून) बंद राहणार आहे.

| June 19, 2013 02:38 am

वाघोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीची तातडीची दुरुस्ती करावी लागणार असल्यामुळे या योजनेतून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (२० जून) बंद राहणार आहे. तसेच या भागांना शुक्रवारी (२१ जून) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. कळस (गणेशनगर), तसेच कळसचा काही भाग, धानोरी (भैरवनगर परिसर), लोहगाव परिसर, एअर फोर्स, लोहगाव विमानतळ, विमाननगरचा काही परिसर, खराडी, समर्थनगर, आपले घर परिसर, विद्यानगरचा काही भाग, सर्वेक्षण क्रमांक ११२, विश्रांतवाडी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 2:38 am

Web Title: no water supply tomorow in wagholilohagaonkharadi
Next Stories
1 नाटय़ परिषद पुणे शाखेच्या निवडणुकीत बांधकाम व्यावसायिक, माजी महापौरांचे पॅनेल
2 शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाच्या मुलीस राष्ट्रवादीची उमेदवारी
3 खडकी कॅन्टोंमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांना अटक व सुटका
Just Now!
X