राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा साताऱ्यात चांगलीच रंगली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केलेला नाही असं पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही दोन प्रकारच्या बैठका घेतल्या पहिली लोकसभेबद्दलची आणि दुसरी विधानसभेबद्दलची. या बैठकीत कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. आम्ही लवकरच सातारा येथील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि ज्यांना लोकसभा लढवायची आहे अशांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ असेही पवार यांनी स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदयराजे भोसले यांना उमेदवारी देऊ नये म्हणून राजेंच्या विरोधकांनी शरद पवारांकडे तशी मागणी केली होती. ज्यानंतर उदयनराजेंनी शरद पवारांकडे भेटीची वेळ मागितली होती. ही भेट पुण्यात झाली असेही समजते आहे. याचवेळी शरद पवार यांनी राफेल विमान कराराबाबतही आपली भूमिका मांडली. राफेल विमानं देशासाठी उपयोगी आहेत मात्र किंमतीबाबत मी भाष्य करू शकत नाही. त्या विमानांच्या किंमती जाहीर कराव्यात अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीत काही गैर नाही. सरकारने हा करार गुप्त असल्याचं म्हटलं आहे. मी देखील संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे. अशा करारांमध्ये तंत्रज्ञान आणि क्षमता याबाबत गुप्तता पाळली जाते पण किंमत उघड करण्यास काही हरकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nobody opposed udayanraje candidature in party meeting says sharad pawar
First published on: 25-09-2018 at 16:59 IST