News Flash

‘पे अ‍ॅण्ड पार्क’बाबत चालढकल

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण व्हावे आणि खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण रहावे यासाठी महापालिका प्रशासनाने पार्किंग धोरण तयार केले आहे.

दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांसाठी सर्व रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क करण्याचे नियोजित आहे.

सत्ताधारी भाजपची सावध भूमिका

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिके ने मंजूर के लेल्या ‘पे अ‍ॅण्ड पार्क’च्या ठरावाला होत असलेला नागरिकांचा विरोध आणि विरोधकांकडून या मुद्दय़ावर कोंडीत पकडले जाईल, अशी भीती सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला वाटत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी भाजपने सावध भूमिका घेतली असून पे अ‍ॅण्ड पार्क ठरावाची अंमलबजावणी करण्याबाबत चालढकल के ली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण व्हावे आणि खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण रहावे यासाठी महापालिका प्रशासनाने पार्किंग धोरण तयार केले आहे. त्याअंतर्गत दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांसाठी सर्व रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क करण्याचे नियोजित आहे. या ठरावाला मोठा विरोध झाल्यामुळे महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. वाढता विरोध आणि राजकीय पक्षांनी के लेली आंदोलने लक्षात घेऊन सर्व शहरात ठरावाची अंमलबजावणी करण्याऐवजी पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर योजना राबविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यालाही तीन वर्षे ओलांडली आहेत. आता तर निवडणुकीच्या वर्षांमुळे या ठरावाची अंमलबजावणी न करण्याचीच भूमिका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाच प्रायोगिक रस्त्यांवरही या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. प्रायोगित तत्त्वावर ठरावाची अंमलबजावणी के ल्यानंतर उर्वरित शहरात टप्प्याटप्प्याने ही योजना राबविण्याचे नियोजित होते. पे अ‍ॅण्ड पार्क योजनेमधून महापालिके ला कोटय़वधी रुपयांचा महसूलही मिळेल आणि वाहतुकीला शिस्तही लागेल, असा दावा करण्यात आला होता. सध्या पाच रस्त्यांवर हा प्रयोग करण्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे आहे. मात्र निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत आहे.

दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी शुल्क प्रस्तावित

पार्किं ग धोरणाअंतर्गत रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांसाठी शुल्क आकारणी प्रस्तावित आहे. दुचाकीसाठी प्रतीतास किमान दोन ते कमाल चार रुपये शुल्क तर चारचाकी वाहनांसाठी किमान १० रुपये ते कमाल २० रुपये असे शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय रात्री रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या गाडय़ांकडूनही शुल्क आकारणी करण्याचा ठराव महापालिके ने मंजूर के ला आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखालील समिती पार्किं ग धोरणाचा अभ्यास करण्याबरोबरच महापालिके ने गेल्या २० वर्षांत वाहनतळांसाठी आरक्षित के लेल्या जागा, त्यांचे विकसन यांचा आढावा घेणार होती. पार्किं गच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करणे, पार्किं ग शुल्कातून मिळणारे उत्पन्न पार्किं ग व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर खर्च करण्याच्या दृष्टीने समितीने काम करणे अपेक्षित होते.

पे अ‍ॅण्ड पार्कचा प्रस्ताव सध्या पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे आहे. करोना संसर्गामुळे त्यावर निर्णय घेता आला नाही. मात्र शहराच्या हिताला प्राधान्यक्रम असल्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

– गणेश बीडकर, सभागृहनेता, पुणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 4:15 am

Web Title: not serious anout pay and park dd 70
Next Stories
1 बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ‘नो पार्किंग’ची मात्रा
2 स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून नितीन लांडगे
3 करोनामुळे महाविद्यालये बंद असताना ‘एनएसएस’च्या शिबिरांचे आयोजन
Just Now!
X