कंपन्यांमध्ये विविध बाबींसाठी सल्लागार नेमलेले असतातच, पण आता कंपनीची सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) संदर्भातही सल्लागार नेमण्याची प्रथा वाढीस लागली असून, त्यासाठी आता अनेक ‘सीएसआर सल्लागार’ निर्माण झाले आहेत.
कंपन्यांमध्ये सामाजिक जबाबदारी विषयक जागरूकता नाही. सल्लागार नेमल्यास कंपनीचा आर्थिक, सामाजिक अशा सर्वच बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. कंपनीला तिच्याकडे असलेला पैसा सामाजिक कामासाठी वापरायचा असतो. समाजात असे अनेक जण असतात ज्यांना पैशांची गरज असते. अशा दोन बाजूंना जोडून देण्याचे काम हा सल्लागार करत असतो.
‘कुठल्याही प्रकारची कंपनी असली, तरी तिला सामाजिक जबाबदारी पार पाडावीच लागते. बऱ्याचदा कंपनी वर्ष संपत आले की जागी होते आणि तात्पुरते काही तरी सामाजिक कार्य केले जाते. कंपन्यांनी आपल्याकडे असलेल्या आर्थिक बळाच्या सामर्थ्यांवर  स्वेच्छेने आणि कायम सामाजिक कार्य करत राहावे यासाठी सल्लागार उपयोगी पडू शकतो. या कंपन्यांच्या माध्यमातून आपले सामाजिक काम अनेक लोकांपर्यंत पोचता येईल,’ अशी माहिती सीएसआर सल्लागार असलेल्या अजय मुनोत यांनी दिली.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
mpsc Mantra Study of economic and social development current affairs
mpsc मंत्र : आर्थिक व सामाजिक विकास, चालू घडामोडींचा अभ्यास