सध्या बाजारात कोंबडीच्या अंडय़ांचे भाव गगनाला भिडले असून त्यांनी चिकनच्या दरांशी साधारण बरोबरी साधली आहे. किरकोळ बाजारात एका अंडय़ाचा दर ७ रुपयांच्या आसपास असून त्यानुसार एक किलो अंडय़ांची किंमत साधारणपणे तितक्याच वजनाच्या सोललेल्या कोंबडीच्या (चिकन) बरोबरीची झाली आहे.

पुणे भागात पोल्ट्री व्यावसायिक सध्या घाऊक बाजारात १०० अंडी ५८५ रुपयांना विकत आहेत. किरकोळ बाजारात एक अंडे साडेसहा से साडेसात रुपयांना विकले जात आहे. एका अंडय़ाचे सरासरी वजन ५५ ग्रॅम असते. त्यानुसार एक किलोग्रॅम अंडय़ांची किंमत १२० ते १३५ रुपये इतकी भरते. त्याच्या तुलनेत सोललेल्या कोंबडीची किंमत प्रति  किलो १३० ते १५० रुपये आहे.

new FPI scam sebi
नव्या FPI फसवणुकीबाबत सेबीकडून गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा; नेमकी फसवणूक कशी करतात?
New Town on Green Belt in Navi Mumbai The reservation of park in the municipal development plan has been cancelled
नवी मुंबईतील हरित पट्ट्यावर नवे नगर; शिळच्या सीमेलगत नागरी वसाहतींचा मार्ग मोकळा
accident
नागपूर: भरधाव कारने पाच वर्षीय मुलाला चिरडले
BMC Recruitment 2024 application date
BMC Recruitment 2024 : ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेत’ नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकतात अर्ज….

गेल्या सहा महिन्यांत पुणे परिसरात १०० अंडय़ांचा घाऊक बाजारातील दर ३७५ रुपयांवरून ५८५ रुपयांवर गेला आहे. मात्र जिवंत कोंबडीचा प्रति किलो दर ९० रुपयांवरून ६० रुपयांवर घसरला आहे.

हिवाळ्यात अंडय़ांची मागणी वाढत असल्याने त्यांचे दरही वाढतात. मात्र अंडय़ांच्या तुलनेत कोंबडय़ा बाजारात विकण्यास लवकर तयार होत असल्याने बाजारात ब्रॉयलर चिकनचा पुरवठाही वाढला आहे. त्यामुळे अंडय़ांचे भाव वाढले असून चिकनचे भाव घटले आहेत आणि दोन्हींमध्ये साधारण बरोबरी साधली गेली आहे, असे तामिळनाडूतील इरोडे येथील एका प्रमुख अंडी व्यावसायिकाने सांगितले.

नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीचे कार्यकारी सदस्य राजू भोसले यांनी अंडय़ांच्या मागणीत १५ टक्क्य़ांनी वाढ झाल्याने भाव वाढल्याचे सांगितले. त्यासाठी भाजीपाल्याचे वाढते दर जबाबदार असल्याचे ते म्हणाले. सध्या किरकोळ बाजारात कांदा व टोमॅटोचे दर प्रति किलो ४० ते ५० रुपयांवर गेले आहेत. तर कोबी, फ्लॉवर आणि वांग्याचे दर प्रति किलो ६० ते १०० इतके आहेत. असा वेळी लोक सामान्यपणे भाजीला पर्याय म्हणून अंडी विकत घेऊ लागतात. त्यामुळे मागणी वाढून अंडय़ांचे भाव वाढले आहेत, असे भोसले म्हणाले.

कर्नाटक आणि तामिळनाडूत दुष्काळ पडल्याने मक्याचे उत्पाद घटून त्याचे दर वाढले आहेत. पोल्ट्री उद्योगासाठी मका हा मुख्य कच्चा माल आहे. कोंबडय़ांचे खाद्य म्हणून प्रामुख्याने मका वापरला जात असून त्याचे भाव एका क्विटलला १९०० रुपये इतके उच्चांकी पातळीवर गेले आहेत. त्यामुळेही अंडय़ांचे दर वाढल्याचे नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या म्हैसूर विभागाचे अध्यक्ष एम. पी. सतीश बाबू यांनी सांगितले.  मात्र कोंबडीच्या तुलनेत अंडय़ांचे दर अधिक वेगाने वाढले. कोंबडय़ा बाजारात विकण्यासाठी लवकर तयार होतात. एका दिवसाचे ४० ग्रॅम वजनाचे कोंबडीचे पिलू ४० ते ४२ दिवसांत दोन ते अडीच किलो वजनाचे होऊन बाजारात विकण्यासाठी तयार होते. याऊलट अंडय़ांचे उत्पादन होऊन ती बाजारात येण्यास अधिक वेळ लागतो. कोंबडीचे वय १८ आठवडय़ांचे झाले की ती अंडी देण्यायोग्य बनते. त्यामुळे यंदा अनेक व्यावसायिकांनी अंडी तयार होण्याची वाट न पाहता कोंबडय़ा बाजारात विकण्यासाठी पाठवल्या. त्यामुळेही चिकनची किंमत घसरली आणि अंडय़ांची किंमत वाढली, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.

नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या म्हैसूर विभागाचे अध्यक्ष एम. पी. सतीश बाबू यांच्या मते हा गतवर्षी झालेल्या नोटाबंदीचा परिणाम आहे. नोटाबंदीमुळे अंडी व चिकन दोन्हींना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे अंडी व चिकन या दोन्हींचे दर यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत गतवर्षीच्या दरांपेक्षा कमी होते, असे ते म्हणाले.