News Flash

प्रलंबित खटल्यांची माहिती आता क्लिकवर

पुणे जिल्ह्य़ातील प्रलंबित खटल्याची माहिती संकलित करण्यात आली आहे

प्रलंबित खटल्याची माहिती पक्षकार तसेच वकिलांना मिळण्यासाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात संगणक ई-सेवा प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन मुख्य न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 

न्यायालयातील पक्षकार, वकिलांसाठी उपयुक्त यंत्रणा

प्रलंबित खटल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा न्यायालयीन यंत्रणेवर ताण पडत असून पक्षकार आणि वकिलांना प्रलंबित खटल्यांची माहिती मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पाश्र्वभूमीवर शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात संगणक ई-सेवा प्रणाली ही यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे खटल्याची माहिती पक्षकार आणि वकिलांना एका क्लिकवर मिळणार आहे. जिल्हा न्यायालयात अशा प्रकारची सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध झाली असून त्याचा फायदा पक्षकार, वकिलांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनादेखील होणार आहे. अशी सुविधा सध्या फक्त मुंबईत उपलब्ध आहे.

पुणे जिल्ह्य़ातील प्रलंबित खटल्याची माहिती संकलित करण्यात आली आहे. ग्लोबस कंपनीने ही यंत्रणा तयार केली आहे. अशा प्रकारची सुविधा मुंबई उच्च न्यायालयात आहे. ही सुविधा राज्यातील अन्य कोणत्याही जिल्हा न्यायालयात नाही. या सुविधेचा सर्वाधिक फायदा पक्षकारांना होणार आहे. या सुविधेचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच झाले. या सुविधेबाबत माहिती देताना पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वाय. जी. शिंदे म्हणाले, की प्रलंबित खटल्यांची माहिती मिळताना पक्षकार आणि वकिलांना त्रास होतो. खटल्याचा क्रमांक मिळवल्यानंतर त्याची कागदपत्रे शोधावी लागतात. ग्लोबस कंपनीने तयार केलेल्या यंत्रणेत पुणे जिल्ह्य़ातील सर्व प्रकारच्या प्रलंबित खटल्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचा समावेश आहे.

खटला क्रमांक, पक्षकाराचे नाव, खटल्याच्या पुढील सुनावणीचा दिनांक, खटल्याच्या अनुषंगाने दिलेले न्यायालयीन आदेश यांची माहिती या यंत्रणेद्वारे मिळणार आहे. जिल्हा न्यायालयात सध्या एकाच ठिकाणी संगणक ई-सेवा प्रणाली यंत्रणा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विधी खात्याने या यंत्रणेसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या काही दिवसांत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात ३५ ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येईल. पुणे जिल्हा आणि शहर परिसरातून दररोज मोठय़ा संख्येने पक्षकार न्यायालयात येतात. खटल्याची माहिती मिळवताना त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन यंत्रणेत खटल्याचा क्रमांक टाकल्यास सर्व माहिती काही क्षणात उपलब्ध होईल.

ई-सेवा प्रणालीचे वैशिष्टय

  • प्रलंबित खटल्याची माहिती
  • खटल्याचा क्रमांक टाकल्यास संपूर्ण माहिती उपलब्ध
  • खटल्याच्या सुनावणीचा पुढील दिनांक कळणार
  • न्यायालयीन आदेशची माहिती कळणार
  • जिल्ह्य़ातील सर्व प्रलंबित खटल्यांची माहिती संकलित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:51 am

Web Title: now get information of pending cases by none click
Next Stories
1 रिक्षाचालकांचे भाडे नाकारणे सुरुच
2 शहरबात पिंपरी-चिंचवड : अस्ताव्यस्त प्रभागांची धास्ती अन् सक्षम उमेदवारांची वानवा
3 हिरवा कोपरा : घरच्या घरी कांदा, गाजर, मुळा भाजी
Just Now!
X