News Flash

आता मंदिरं उघडण्यासही परवानगी द्यावी; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

पुण्यात महासंघाकडून कसबा गणपतीसमोर शंखनाद आंदोलन

पुणे : राज्यातील मंदिरेही उघडण्यास आता परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने मंगळवारी पुण्यात शंखनाद आंदोलन केले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासही शासनाने आता परवानगी द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने पुण्यात शंखनाद आंदोलन करण्यात आले. मंगळवारी ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती मंदिराबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महासंघाचे आनंद दवे म्हणाले, “राज्यातील अनेक भागात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने, सरकार प्रयत्न करीत आहे. लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू होती, त्यानंतर आता लॉकडाउन शिथिल केल्याने सर्व प्रकाराची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, मंदिरं, नाट्यगृह, शॉपिंग मॉल अद्यापही बंद आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आता मंदिरेही लवकरात लवकर सुरु करावीत. सकाळी किंवा संध्याकाळी किमान दोन तास तरी मंदिरे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. मंदिरे सुरू झाल्यास त्यांच्याशी निगडित असलेल्या नागरिकांचा रोजगारही सुरु होण्यास मदत होईल”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 1:52 pm

Web Title: now temples should also be allowed to open demand of all india brahmin federation aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरणातील ११ आरोपींना करोनाची लागण
2 मुंबईकर आणि पुणेकरांना सूर्यग्रहण पाहण्याची संधी; जाणून कधी आणि कसे
3 शैक्षणिक वर्षांचा घरातूनच श्री गणेशा
Just Now!
X