News Flash

Coronavirus: पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमधील नर्सला करोनाची लागण; ३० नर्स झाल्या क्वारंटाइन

संगमवाडी परिसरात रविवारी करोनामुळे दोन जणांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील एका ४५ वर्षांच्या नर्सला करोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल आहे. यानंतर संबंधीत नर्सच्या संपर्कात झालेल्या ३० नर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती रुबी हॉल हॉस्पिटलचे आरोग्य सेवा संचालक संजय पाठारे यांनी दिली.

रविवारी पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते असे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पुण्यात आतापर्यंत करोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज १३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १८९५ वर पोहचली आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा करोना झाल्याचं उघड

दरम्यान, राज्यातील करोनाचा केंद्रबिंद ठरलेल्या पुण्यात वेगळीच घटना समोर आली. करोनाग्रस्त रुग्णांच्या घरातील एका दाम्पत्याला डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा करोना असल्याचं निष्पन्न झालं. करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयानं या दाम्पत्याचे नमुने घेतले होते. मात्र, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी सोडण्यात आल्यानंतर या दाम्पत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 6:30 pm

Web Title: nurse at ruby hall clinic in pune having corona infection 30 other nurses became quarantine aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 CoronaVirus : पुण्यात नमुने घेऊन घरी सोडलेल्या दाम्पत्याला करोनाचा संसर्ग
2 Coronavirus : पुण्यात दोन महिलांचा मृत्यू, शहारातील मृतांचा आकडा 31 वर
3 कर्तव्यनिष्ठ खाकी; मुलगा मृत्यूशी झुंज देत असताना बाप बजावतोय पोलिसाचं कर्तव्य
Just Now!
X