News Flash

बँक ऑफ महाराष्ट्रच्या दोन माजी अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा

या कंपनीच्या संचालकांशी संगनमत करून मालमत्ता तारण ठेवली होती.

 

वीस कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी सीबीआयची कारवाई

मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) बँक ऑफ महाराष्ट्रच्या दोन माजी अधिकाऱ्यांसह चौघांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला. सन २०१२ आणि २०१३ मध्ये विविध कंपन्यांच्या नावाने मालमत्ता तारण ठेवून वेगवेगळी कर्जप्रकरणे सादर करून सुमारे वीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अधिकारी नितीन मारुतीराव काळे, अजित गोखले यांच्यासह सुनील दत्तात्रय मदने, विनोद यशवंत रूपनवर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. काळे हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्वे रस्ता शाखेत सहायक सरव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी बारामतीतील मॅक्स मल्टीकॉन या कंपनीच्या नावाने ४ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्जप्रकरण सादर केले. त्यासाठी या कंपनीच्या संचालकांशी संगनमत करून मालमत्ता तारण ठेवली होती. या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती. त्यामुळे बँकेला तोटा झाला होता, अशी माहिती सीबीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

दुसऱ्या कर्जप्रकरणात मॉडेल कॉलनीतील बँक ऑफ महाराष्ट्रचे सहायक सरव्यवस्थापक गोखले यांनी बारामतीतील यशवंत एन्टरप्रायझेसचे संचालक यशवंत रूपनवर यांच्याशी संगनमत करून कर्जप्रकरण सादर केले होते. सुनील मदने यांनीही गोखले यांच्याशी संगनमत करून आणखी एका प्रकरणात कर्ज मिळविले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येत असून बुधवारी बारामती आणि पुणे परिसरात राहणाऱ्या आरोपींच्या घराची सीबीआयने झडती घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 4:29 am

Web Title: offence against four officers of bank of maharashtra
Next Stories
1 उच्च क्षमतेच्या, टिकाऊ व हलक्या उपग्रहांसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा – डॉ. सुरेश नाईक
2 महापालिकेतील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन
3 डेक्कन, एरंडवणे भागात घरफोडय़ा करणाऱ्या टोळीला पकडले
Just Now!
X