19 September 2020

News Flash

महिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल

फरार ऑफिसबॉयचा पोलिसांकडून शोध घेतला जातो आहे

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या महिला स्वच्छतागृहात एक ऑफिस बॉय गुपचूप मोबाईल ठेवायचा आणि वॉशरूममध्ये येणाऱ्या महिलांचे व्हिडिओ चित्रित करायचा. ही गोष्ट एका महिला कर्मचाऱ्याला लक्षात आली. ज्यानंतर तिने यासंदर्भातली माहिती वरिष्ठांना दिली. विकास अंकुशराव घाडगे असं या ऑफिसबॉयचं नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. विकास फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथकही रवाना झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास घाडगे हा एका सॉफ्टवेअर कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. महिला वॉशरूमची स्वच्छता करण्याची मुभा त्याला देण्यात आली होती. स्वच्छता करण्यासाठी जेव्हा विकास या वॉशरूममध्ये जायचा तेव्हा तो तिथल्या पीओपी टाईल्समध्ये मोबाईल व्हिडिओ मोडमध्ये ऑन करून ठेवून द्यायचा. एक दिवस त्याला मोबाईल घेऊन जाताना एका महिला कर्मचाऱ्याने पाहिले. तिला संशय आला त्यामुळे, विकास बाहेर येताच तिने वॉशरूममध्ये जाऊन पहाणी केली. त्यावेळी त्या महिलेला छाताच्या बाजूला एक काळ्या रंगाचा मोबाईल आढळून आला. ही बाब समजताच एकच खळबळ उडाली. आपण काय करत होतो हे कंपनीत समजल्याचे विकासला कळले. ज्यानंतर तो पळून गेला, पोलीस आता फरार विकासचा शोध घेत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 12:33 pm

Web Title: office boy keep mobile in ladies washroom police case registered in pimpri scj 81
Next Stories
1 तक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल
2 मॉलमध्ये विनामूल्य पार्किंग
3 शहरापेक्षा हायवेवर हेल्मेटसक्तीची जास्त गरज-गिरीश बापट
Just Now!
X