‘पुणे तिथे काय उणे’ असे कायमच म्हटले जाते. सजग नागरिक हे मुंबईपाठोपाठ पुण्याचेही वैशिष्ट्य. याच पुण्यातल्या आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पुण्यात वाहतूक कोंडी हा विषय आता सगळ्यांच्या अंगवळणी पडला आहे आणि त्यातून वाट काढणंही. मात्र कधी कधी वाहतूक कोंडी इतकी प्रचंड असते की पंधरा मिनिटांचं अंतर कापण्यासाठी दोन तास लागतात. अशाच वाहतूक कोंडीतून आजींनी वाट काढली.

पाहा व्हिडिओ

पुण्यातल्या मेहेंदळे गॅरज परिसरातल्या एका चौकात वाहतूक कोंडी झाली. बराच वेळ ही कोंडी काही सुटेना. तेव्हा पुण्यातल्या आजींनी वाहनातून उतरुन स्वतः कोणत्या गाडीनं कसं जावं याच्या सूचना केल्या. कोणत्या गाडीनं थांबावं आणि दुसऱ्या वाहनांना आधी जाऊ द्यावं हेदेखील सांगितलं. मग वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली.